पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गाला सुरक्षा 'कवच'  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गाला सुरक्षा 'कवच'

पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावरून रोज अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्याची ये-जा सुरु असते. आता एक्स्प्रेस रेल्वे गाड्याची टक्कर टाळण्यासाठी हा लोहमार्ग ‘कवच’ प्रणालीने अधिक सुरक्षित केल्या जात आहेत.

Swapnil S

कराड : पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावरून रोज अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्याची ये-जा सुरु असते. आता एक्स्प्रेस रेल्वे गाड्याची टक्कर टाळण्यासाठी हा लोहमार्ग ‘कवच’ प्रणालीने अधिक सुरक्षित केल्या जात आहेत.

या मार्गावरून धावणाऱ्या व दक्षिणेतील बंगळुरूपासून उत्तरेतील नवी दिल्ली पर्यंत धावणाऱ्या या मार्गावरील काही गाड्यांना ही प्रणाली बसवण्यात आली असून सर्वच महत्त्वाच्या गाड्यांमध्ये ती बसविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

मध्य रेल्वेने पुणे-मिरज लोहमार्गावर 'कवच' प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित केली आहे. गेल्या जुलैपासून पुणे-मिरज-कोल्हापूर विशेष गाडीसोबत या प्रणालीचे संचालन सुरू करण्यात आले.

पुणे ते बंगळुरूपर्यंतच्या एकूण ७०० किमी लोहमार्गांपैकी २५० किमीपेक्षा जास्त अंतरावर या कवच चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामध्ये पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाचाही समावेश आहे.

मुंबई-पुणे-बंगळुरू मार्गावर संध्या वंदे भारत एक्स्प्रेसही सुरू झाली आहे. या गाडीमध्ये सुरक्षिततेसाठी आधुनिक ‘कवच’ प्रणाली प्रारंभापासूनच बसवण्यात आली आहे.एकाच रेल्वेमार्गावर दोन गाड्या आल्यास किंवा चालकाकडून लाल सिग्नल तोडला गेल्यास ही यंत्रणा वायरलेसद्वारे धोक्याचा सिग्नल पकडते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित