नसरापूर प्रकरण : आरोपीला १२ मेपर्यंत कोठडी 
महाराष्ट्र

नसरापूर प्रकरण : आरोपीला १२ मेपर्यंत कोठडी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाला पुणे न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाला पुणे न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संताप आणि सुरक्षेची परिस्थिती पाहता, आरोपीला गुरुवारी प्रत्यक्षात न्यायालयात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी आणि रासायनिक विश्लेषण अहवाल तपासणी करण्यात आली आहे. तसेच, आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का किंवा पीडित मुलीवर आधीही अत्याचार केला होता का, याचा शोध घेणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी घटना घडल्यानंतर त्याच्या खांद्यावर एक गाठोडे घेऊन जाताना दिसत आहे त्या गाठोड्याचे शोध घेणे बाकी असून त्यात नेमके काय होते याबाबत देखील तपास करणे बाकी आहे. तसेच आरोपी आणि मुलगी गोठ्यात जात असताना त्याच्या हातात शेवपुडा देखील दिसून आला आहे. ती शेव नेमक्या कोणत्या दुकानातून घेतली याबाबत तपास करणे आहे.

पीडित मुलीच्या शरीरावर ज्या जखमा आढळून आले आहेत त्या कोणत्या हत्याराने करण्यात आले आहे याबाबत तपास करणे आहे.आरोपीने चिमुकलीची हत्या करण्यासाठी नेमक्या कोणत्या हत्याराचा वापर केला, ते अद्याप हस्तगत करायचे असून महत्त्वाचे पुरावे गोळा करायचे आहेत. ज्या साक्षीदारांनी आरोपीला मुलीला घेऊन जाताना पाहिले, त्यांचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू आहे. या गुन्ह्यात आरोपीला अन्य कोणाची मदत लाभली आहे का, याचीही कसून चौकशी पोलिस करत आहेत.

थलपती होणार मुख्यमंत्री; ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर, आज शपथविधी

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानला अखेर संभाजीनगरात अटक; MIM नगरसेवक सहआरोपी, दोन स्मार्टफोन जप्त, महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता

Weather Update : मान्सून वेळेवरच येणार; ‘एल निनो’मुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

‘पॉश’चे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड