महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; ९ जणांचा जागीच मृत्यू

प्रवाशांनी भरलेली मॅक्झिमो गाडी नारायणगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या एका टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे मॅक्झिमो थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसवर जाऊन आदळली. ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. आयशर आणि बसच्या कचाट्यात सापडलेल्या मॅक्झिमो गाडीचा...

Swapnil S

पुण्यात शुक्रवारी सकाळी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

पुणे- नाशिक महामार्गावर सकाळी १० वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटी बसमध्ये हा विचित्र अपघात झाला. नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्यानजीक हा भीषण अपघात झाल्याचे समजते.

"ट्रक (आयशर टेम्पो) ने एका मिनीव्हॅन (मॅक्झिमो) ला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला, जी पुढे एसटी बसला (जी उभी होती) धडकली", अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

प्रवाशांनी भरलेली मॅक्झिमो गाडी नारायणगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या एका टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे मॅक्झिमो थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसवर जाऊन आदळली. ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. आयशर आणि बसच्या कचाट्यात सापडलेल्या मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला आणि गाडीमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय २ ते ३ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती असून नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री