महाराष्ट्र

IIT बॉम्बे संशोधन प्रकल्पाचे आमिष; पुण्यातील खाजगी विद्यापीठाची कोट्यवधींची फसवणूक, तेलंगणातून अभियंत्याला अटक

पुण्यातील एका खाजगी विद्यापीठाची तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तेलंगणातील इलेक्ट्रॉनिक्स अभियंताला बेड्या ठोकल्या आहेत.

नेहा जाधव - तांबे

पुण्यातील एका खाजगी विद्यापीठाची तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तेलंगणातील इलेक्ट्रॉनिक्स अभियंताला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने स्वतःला आयआयटी मुंबईचा प्राध्यापक सांगून विद्यापीठाची फसवणूक केली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सीताय्या किलारू (वय ३४, रा. याप्राल, हैदराबाद) याला तेलंगणा येथून अटक केली. तो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियंता आहे. त्याने यूकेमधील विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवली आहे. त्याने २०१९-२० मध्ये यूपीएससीची मेन्स परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे.

आरोपीने तो आयआयटी मुंबईचा प्राध्यापक असून विद्यापीठाला आयआयटी बॉम्बेकडून संशोधन प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विद्यापीठ प्रशासनाने या आमिषाला बळी पडून २५ जुलै ते २६ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या खात्यांमध्ये २.४६ कोटी रुपये दिले.

पुणे सायबर पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू केला आणि सीताय्याला तेलंगणातील त्याच्या गावी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सायबर क्राईम विभागाकडून सुरू आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत