महाराष्ट्र

पुण्यातील बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट

कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, हा आरोपी पीडित तरुणीचा परिचित निघाला असून, ही गोष्ट पीडितेने पोलिसांपासून लपवून ठेवल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, हा आरोपी पीडित तरुणीचा परिचित निघाला असून, ही गोष्ट पीडितेने पोलिसांपासून लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. तसेच घटनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झाला नव्हता. यातच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोबाइलमध्ये काढलेला सेल्फी तरुणीने एडिट करून त्याखाली मेसेजही तिनेच लिहल्याचे उघड झाले आहे.

संगणक अभियंता तरुणीवर बलात्काराच्या घटनेने पुणे शहरात खळबळ माजली होती. महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत काही संघटनांनी आंदोलनही केले होते. तर पोलिसांनी ही बाबा गांभीर्याने घेत तब्बल २२ पथके दिवस रात्र तपासाकामी नेमली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला आरोपी एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. तो मागील एका वर्षापासून तरुणीच्या संपर्कात आहे. दोघांचा परिचय त्यांच्या समाजाच्या समाज मेळाव्यात झाला होता. घटनेच्या दिवशी तो सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याचे छायाचित्र पोलिसांनी दाखवल्यावर मात्र पीडितेने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. तिने हे का सांगितले, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

तो मागील एका वर्षापासून तरुणीच्या संपर्कात आहे. तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही, पीडितेचा जबाब नोंदवला जात आहे. सध्या कोणत्याही निष्कर्षाप्रत पोलीस पोहचले नाहीत. मात्र, आरोपी आमच्या ताब्यात आहे. पीडितेचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेश केले जात आहे.
- अमितेश कुमार (पोलीस आयुक्त)

संबंधित तरुण तिच्या सदनिकेत सव्वा सात वाजता जाताना दिसत आहे. तर सदनिकेतून पावणे नऊला बाहेर पडत आहे. तो बाहेर पडल्यावर सेल्फी एडिट केल्याचे आणि त्याखाली संदेश लिहिल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत