पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; १०० जण ताब्यात (Photo - FPJ)
महाराष्ट्र

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; १०० जण ताब्यात

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर पार्ट्यांचा मुद्दा गाजत असतानाच, पुणे पोलिसांनी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली.

Swapnil S

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर पार्ट्यांचा मुद्दा गाजत असतानाच, पुणे पोलिसांनी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली. पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावच्या हद्दीत गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या छाप्यात सुमारे १०० हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये अनेक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या धडक कारवाईबाबत पुण्याच्या अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात एका आलिशान बंगल्यात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. आयोजकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुपारी १ ते रात्री ११.३० वाजेपर्यंतची तात्पुरती परवानगी घेतली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता मध्यरात्री उशिरापर्यंत ही पार्टी जोरात सुरू होती.

नशेचे पदार्थ आणि लाखो रुपयांचे मद्य जप्त

गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री जेव्हा या बंगल्यात प्रवेश केला, तेव्हा तिथे उपस्थित असलेले बहुतांश तरुण-तरुणी अंमली पदार्थांच्या आणि दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद होते. पोलिसांनी तातडीने या सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पोलिसांनी लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा जप्त केला आहे.

ड्रग्जविरोधी मोहीम सुरू, पाळेमुळे खणून काढणार: मुख्यमंत्री

‘राज्यात आणि देशात सध्या अंमली पदार्थांविरोधात 'नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज' ही मोहीम तीव्र गतीने राबवली जात आहे. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चोख माहिती गोळा करून मोठ्या कारवाया केल्या जात असून, कुठल्याही परिस्थितीत ड्रग्जच्या काळ्या जाळ्याची पाळेमुळे खणून काढली जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आगामी काळातही या कारवाया सातत्याने सुरूच राहतील, असा इशारा त्यांनी अंमली पदार्थ तस्करांना दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तरुणांसाठी देशनिहाय स्किल पासपोर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष