महाराष्ट्र

संतापजनक! पुण्यात दोन चिमुकलींवर स्कूल व्हॅनचालकाचा अत्याचार

पुण्यातील वानवडी परिसरात एका नामांकित शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये संबंधित व्हॅनच्या चालकानेच ६ वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात एका नामांकित शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये संबंधित व्हॅनच्या चालकानेच ६ वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी नराधमाने सलग चार दिवस पीडित मुलींवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे.

पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी ४५ वर्षीय नराधम स्कूल व्हॅनचालकाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्कूल व्हॅनचालक आरोपी संजय रेड्डी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅनमधून शाळेत सोडण्याचे काम करत असतो. या आरोपीच्या स्कूल व्हॅनमध्ये दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवण्यात येत होते. आरोपी चालवत असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये दोन्ही मुलींना तो जवळ बसवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाच्यता कुठे केली तर धमकीसुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून आरोपी हे अत्याचार करत होता. दरम्यान, अल्पवयीन मुलगी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट ठिकाणी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याबाबत विचारपूस केली असता आरोपी संजय याने केलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी संजय रेड्डी याला अटक केली आहे. त्याला गुरुवारी पुणे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी आरोपी कोर्टात न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला.

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक