महाराष्ट्र

पुण्यात विद्यार्थिनीची आत्महत्या

शहरातील नामांकित बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Swapnil S

पुणे: शहरातील नामांकित बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्योती कृष्णकुमार मीना असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती मूळची राजस्थानची होती आणि महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षात शिकत होती. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, त्यात तिने अभ्यासाच्या ताणामुळे आणि नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे संकेत दिले आहेत.

पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात ज्योतीने आपल्या आई-वडिलांना उद्देशून लिहिले आहे की, मला शिकायचे आहे, पण माझ्याकडून होत नाहीये, मला माफ करा. या चिठ्ठीमुळे तिच्या आत्महत्येमागे अभ्यासाचा ताण आणि नैराश्य हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्योती गेल्या काही वर्षांपासून मानसिक तणावाखाली होती आणि तिच्यावर उपचारही सुरू होते.

ती आठवीत असल्यापासूनच तिला मानसिक त्रास होता, असेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी तिने टक्कल देखील केले होते. तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिचे कुटुंबीय राजस्थानहून पुण्याला दाखल झाले आहेत. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका; मुंबईत आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलनाला मनाई, फक्त १ दिवसाची परवानगी

नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल

टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल

उत्तर प्रदेश, बिहार निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या CBI चौकशीची मागणी; सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त