पुण्यात अवकाळी पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहनं अडकली; Video व्हायरल 
महाराष्ट्र

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहनं अडकली; Video व्हायरल

पुण्यात अवकाळी मुसळधार पावसाने अनेक भाग जलमय झाले असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनं अडकली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Mayuri Gawade

पुणे शहरात गुरुवारी (दि.०२) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. कोंढवा, उत्तमनगर आणि हडपसरसह अनेक भागांत ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला.

एका तासात विक्रमी पाऊस

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांत अवघ्या एका तासात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली. खडकवासला येथे ९९ मिमी पावसाची नोंद झाली, तर सिंहगड रोड येथे ९४.८ मिमी आणि बिबवेवाडी येथे ७ मिमी पाऊस झाला.

याशिवाय कोथरूड येथे ६४.८ मिमी, वारजे येथे ५६.४ मिमी, वानवडी येथे ५३.२ मिमी, शिवाजीनगर येथे ४८.४ मिमी, ढोले पाटील मार्गावर ४८.२ मिमी आणि हडपसर येथे ३६.४ मिमी पावसाची नोंद झाली.

रस्त्यांवर पाणी, वाहनचालकांची गैरसोय

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचलं. काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याने वाहनं पाण्यात अडकलेली दिसली. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची मोठी कसरत झाली. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहा

हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवार आणि शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, जालना, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी गुरुवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता.

तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. मात्र पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हे यापासून वगळण्यात आले होते.

पुढील अंदाज...

शुक्रवारी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड आणि जालना जिल्ह्यांनाही त्याच श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. धुळे, नाशिक, पुणे, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?

मुंब्र्यात पुन्हा गोळीबार! मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या संतापातून फायरिंग; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी; Video

Mumbai : प्रवाशांना दिलासा! मेट्रो ३ वर नवे प्रवेशद्वार सुरू; 'या' प्रमुख स्थानकांवर सुविधा

Ramayana Teaser : रणबीरचा राम अवतार पाहून चाहते भारावले; आलियानेही केलं कौतुक, म्हणाली - "जगावेगळी गोष्ट"