Pune : पबमधील वादातून तरुणावर हल्ला; चौघांना अटक प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : पबमधील वादातून तरुणावर हल्ला; चौघांना अटक

पबमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील विमाननगर परिसरात घडली. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका महिलेसह चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

Swapnil S

पुणे : पबमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील विमाननगर परिसरात घडली. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका महिलेसह चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

ऋतिक मधुकर कोंडे (२६) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जेम्स फिलिप मकासरे (४१), प्रिया जेम्स मकासरे (३२), भारत संजय ठाकूर (४०) आणि वेदांत शैलेंद्र भालेराव (२६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक हा खासगी कंपनीत नोकरीला आहे. तो मित्र प्रशांत वर्मा याच्यासोबत नगर रस्त्यावरील फिनिक्स मार्केटसिटी परिसरातील 'बॅक स्टेज' पबमध्ये गेला होता. रात्री दोघेही पबमध्ये नृत्य करत असताना ऋतिकने शर्ट काढून हवेत फिरविला. यावरून आरोपींसोबत त्यांचा वाद झाला.

त्यानंतर ऋतिक आणि त्याचा मित्र पबमधून बाहेर पडले. मात्र, आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठून शिवीगाळ केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू ऋतिकच्या डोक्यात घातला. तसेच झाडाच्या फांदीनेही मारहाण केली. या हल्ल्यात ऋतिक जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांना अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक एस. पालवे पुढील तपास करीत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग; पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट; शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा