Nikhil Kelkar
महाराष्ट्र

वारकऱ्यांना ‘क्यू आर कोड’वर मिळणार सुविधांची माहिती

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात येणार असून यावर्षी माऊलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळ्यातील स्वच्छता सुविधांची माहिती आता ‘क्यू आर कोड’वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Swapnil S

कराड : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात येणार असून यावर्षी माऊलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. पालखी सोहळा सातारा जिल्ह्याच्या हद्दीतुनही जाणार असल्याने सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळ्यातील स्वच्छता सुविधांची माहिती आता ‘क्यू आर कोड’वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना स्वच्छतेच्या सुविधा जलद उपलब्ध होणार आहेत. यावर्षीही पालखी सोहळ्यात १८०० फिरती शौचालये उपलब्ध असणार आहेत. सातारा जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे,पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गावरील सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली. वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याबाबत प्रशासनाने नियोजन

केले असून त्यादृष्टीने विविध विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. पालखी सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक सहभागी होत असल्याने सोहळ्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्यात स्वच्छता ठेवण्याबरोबर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व असते. त्यानुसार १४६ पुरुष स्नानगृहे, १६७ महिला स्नानगृहे, महिला व पुरुषांसाठी ७२ तात्पुरत्या मुताऱ्या असणार आहेत.

एका क्लिकवर होणार माहिती उपलब्ध

माउलींच्या सोहळ्यात दरवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत भर पडत असून वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. वारकऱ्यांना उपलब्ध सुविधांची माहिती व्हावी, यासाठी क्यू आर कोडची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळणार आहे. प्रत्येक सुविधेवर क्लिक करताच त्याचे गुगल लोकेशन मॅप पाहायला मिळणार आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायत हद्दीत १३ ठिकाणी १८०० शौचालये, तरडगाव येथे १८ ठिकाणी १८०० शौचालये, फलटण येथे १६ ठिकाणी १८०० शौचालये, बरड येथे १९ ठिकाणी १८०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सार्वजनिक शौचालय, सुलभ सार्वजनिक शौचालय, मंगल कार्यालय शौचालय, हॉटेल शौचालय, वैयक्तिक शौचालय, आश्रमशाळा अशा १० हजार १०७ शौचालयाची व्यवस्था असणार आहे. पाडेगाव, तरडगाव येथे कायमस्वरूपी सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. - प्रज्ञा माने- भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’