Photo : X (Ashish Shelar)
महाराष्ट्र

रघुजी भोसले महाराजांची तलवार राज्य सरकारकडे; मंत्री शेलार यांनी लंडनच्या मध्यस्थाकडून घेतली ताब्यात

नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले महाराजांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार सोमवारी लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवार १८ ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले महाराजांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार सोमवारी लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवार १८ ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.

ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त २८ एप्रिल २०२५ रोजी अचानक महाराष्ट्रात येऊन धडकले. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सदर तलवार शासनाला मिळावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले. दूतावासाशी संपर्क करून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करून या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थीने हा लिलाव जिंकला होता त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून सोमवारी मंत्री शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. तलवार ताब्यात घेतली तेव्हा लंडन येथे सुद्धा तिथले मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवीही सहभागी झाले आहेत.

तलवार १८ ऑगस्टला मुंबईत येणार

कायदेशीर बाबी पूर्ण करून ही तलवार सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर दाखल होईल. स्वतः सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बाइक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आणण्यात येणार आहे, तर याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गड गर्जना’ हा कार्यक्रम होणार आहे.

मुसळधारचा इशारा! राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

ध्वजारोहणास नाशिकऐवजी गोंदिया दिल्याने भुजबळ नाराज? प्रकृतीच्या कारणावरून जाण्यास दिला नकार

आम्हालाही "कोट्यवधी मोजा, गुलाल उधळा"चे आमिष; माजी आमदार संजय चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

Mumbai : आगामी BMC निवडणुकीच्या कामास नकार; साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविकांचा पवित्रा

पाकिस्तानवर मेहरबान ट्रम्प! ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’, ‘माजीद ब्रिगेड’चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश