संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

राहुल गांधी यांची याचिका पुण्यातील न्यायालयाने फेटाळली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका न्यायालयाने फेटाळली आहे.

Swapnil S

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका न्यायालयाने फेटाळली आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात लंडनमध्ये भाषण करताना केलेल्या कथित अवमानकारक उल्लेखांवरून त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल झालेला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, गांधी यांच्यावतीने याचिकाकार सावरकर यांच्या आईची वंशावळ मागण्यात आली होती.

न्यायदंडाधिकारी (प्रथण श्रेणी) अमोल शिंदे यांनी सांगितले की, हे प्रकरण कथित आक्षेपार्ह भाषणाशी संबंधित आहे, हिमानी सावरकर यांच्या वंशावळीशी संबधित नाही. हिमानी सावरकर ह्या महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे याच्या कन्या होत्या.

राहुल गांधी यांच्या वतीने युक्तिवाद करताना मिलिंद पवार यांनी सांगितले की, तक्रारदाराने आपल्या पितृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिली आहे. मात्र मातृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिलेली नाही. ही वंशावळ सुनावणीमध्ये आवश्यक आहे. मात्र कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक