महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं होतं. यावर आता नार्वेकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नवशक्ती Web Desk

विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात सुनावणी करुन त्याबाबतची रुपरेषाही ठरवावी कार्यवाही करावी. तसंच दोन आठवड्यानंतर त्याबाबतची सगळी माहिती सुप्रीम कोर्टात द्यावी, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं. त्यावर आता राहुल नार्वेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोर्टाच्या निर्देशावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, अद्याप माझ्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयातील कोणतीही माहिती आलेली नाही. संपूर्ण माहिती काय आहे, ती घ्यावी लागेल. त्यानंतर पुढच्या कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. उलट सुप्रीम कोर्टाने विधासभा अध्यक्षपद संवैधानिक पद असल्याचं मान्य केलं आहे. असं ते म्हणाले. दरम्यान, याबाबतची कारवाई लवकरात लवकर होईल. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. त्याचवेळी घाईने निर्णय घेतला जाणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आमदार अपात्रेबाबत अजुन काहीचं झालं नाही का? असा प्रश्न विचारत म्हटलं की, विधानसभा अध्यक्ष घटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत कार्यवाही अनिश्चित काळासाठी लांबवू शकत नाही. शिवाय न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा आदर करायलाच हवा, असही सरन्यायधीश म्हणाले.

Nirmala Sitharaman : GST कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचले

मराठा GR मुळे किती जणांना मिळाले प्रमाणपत्र? राधाकृष्ण विखे-पाटलांना घेराव

पाटोळे लाच प्रकरणात तक्रारदारांना धमकी; ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

'तो' GR रद्द करण्याची जबाबदारी आता भुजबळांची; विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

पुन्हा एकदा भर न्यायालयात बूटहल्ला