महाराष्ट्र

सुशांत सिंग राजपूत प्रकरण; रियाला कॉल करणारा 'एयू' नेमकं कोण? शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल

सीबीआयच्या रिपोर्टनंतर पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण चर्चेत आले आहे. शिंदे गटाच्या नेत्याने केले गंभीर आरोप

प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. "रिया चक्रवर्तीच्या फोनवर 'एयू' नावाने ४४ वेळा फोन आले होते. 'एयू' म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले," असा गंभीर आरोप राहुल शेवाळे लोकसभेत यांनी केला. पण, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले. "राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे," असे आव्हान कायंदे यांनी केले आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण या दोन्हींमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप याआधीही करण्यात आले होते. ते म्हणाले, "लोकसभेमध्ये ड्रग्स या विषयावर चर्चा सुरु होती. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत."

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव