रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष? 
महाराष्ट्र

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?

रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून, यावेळी महायुतीतील दोन प्रमुख मित्रपक्ष आमनेसामने येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी पेण विधानसभा मतदारसंघाबाबत केलेल्या एका मोठ्या विधानामुळे जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Swapnil S

पेण : रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून, यावेळी महायुतीतील दोन प्रमुख मित्रपक्ष आमनेसामने येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी पेण विधानसभा मतदारसंघाबाबत केलेल्या एका मोठ्या विधानामुळे जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आगामी काळात पेण विधानसभा मतदारसंघातील आमदार बदलणार असल्याचा दावा करत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष आव्हान दिले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सध्या पेणचे नेतृत्व भाजपचे आमदार रवीशेठ पाटील करत आहेत. तरीही महेंद्र दळवी यांनी या मतदारसंघातील बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अलिबागवर जितके प्रेम आहे, तितकेच प्रेम पेण विधानसभा मतदारसंघावरही असल्याचे त्यांनी नमूद केले. तेथील स्थानिक नेते नेमके काय करतात याची आपल्याला कल्पना नाही, असे म्हणत महेंद्र दळवी यांनी पेणच्या स्थानिक राजकारणावरही भाष्य केले. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात नव्या संघर्षाचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमधील नेत्यांमध्ये तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. एकमेकांना डिवचण्याची कोणतीही संधी हे नेते सोडत नाहीत. रायगडमध्ये प्रामुख्याने शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा सामना रंगलेला दिसत होता. पालकमंत्री पदाचा प्रश्न असो, विधान परिषदेची निवडणूक असो किंवा अजितदादांचा विमान अपघात असो, अशा विविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर सातत्याने टीकास्त्र सोडले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : बनावट औषधप्रकरणी इंडुकेअरचे परवाने रद्द; उत्पादन, पॅकिंग, तपासणी व वितरण तातडीने बंद करा, FDA चे आदेश

पेपरफुटीला कठोर शिक्षा; १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सुधारणांऐवजी शिक्षेवर भर; व्ही. राधा समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर

भाजप-अकाली दलाची पुन्हा युती; पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्री: अमित शहा

शतकमहोत्सवी संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी