रायगडावर प्री-वेडिंग शूटमुळे वाद; शिवसमाधी परिसरातील व्हिडीओ व्हायरल 
महाराष्ट्र

रायगडावर प्री-वेडिंग शूटमुळे वाद; शिवसमाधी परिसरातील व्हिडीओ व्हायरल

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेला किल्ले रायगड पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. किल्ल्यावर असलेल्या शिवसमाधी परिसरात एका जोडप्याने प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Swapnil S

रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेला किल्ले रायगड पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. किल्ल्यावर असलेल्या शिवसमाधी परिसरात एका जोडप्याने प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित जोडपे शिवसमाधी परिसरात चित्रीकरण करताना दिसत असून, ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या स्थळाच्या पावित्र्याचा भंग झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ‘रायगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे.

अशा ठिकाणी मनोरंजनाच्या नावाखाली प्री-वेडिंग शूट करणे अयोग्य आहे,’ अशा तीव्र शब्दांत अनेकांनी निषेध नोंदवला आहे.

या घटनेनंतर किल्ल्यावरील संवेदनशील भागांमध्ये अशा प्रकारच्या चित्रीकरणावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘रायगडाची पवित्रता जपा’ या हॅशटॅगद्वारे सोशल मीडियावर निषेधाची लाट उसळली असून, शिवभक्तांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या शूटसाठी संबंधितांनी अधिकृत परवानगी घेतली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण तसेच स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

ई-टीडीआर नोंदणी बंधनकारक; चोरीच्या टीडीआर खरेदीला बसणार लगाम

Mumbai : गारगाईसाठी स्पेन, इटली, जपानच्या कंपन्यांची धाव; प्रकल्पावर तज्ज्ञ सल्लागारांचा वॉच

Mumbai : कोस्टल रोडच्या दोन फ्लड गेट्सचे नुकसान; समुद्राच्या लाटा धडकल्या; आराखड्यात तांत्रिक त्रुटी

अखेर बिहारही भाजपकडे; सम्राट चौधरी नवे मुख्यमंत्री, आज घेणार शपथ

मुंबईत उकाडा वाढला; यलो अलर्ट जारी