रायगडमध्ये स्ट्राँग रूमला सुरक्षेचा पहारा 
महाराष्ट्र

रायगडमध्ये स्ट्राँग रूमला सुरक्षेचा पहारा; ईव्हीएम मशिन्सवर सीसीटीव्हीसह पोलीस प्रशासनाची नजर

रायगड जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदानानंतरच्या ईव्हीएम मशिन्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाने नगरपरिषद-नगरपंचायतनिहाय स्ट्राँग रूमची अंतिम यादी जाहीर केली असून, या ठिकाणी २४ तास CCTV, पोलीस व SRPF चा तिहेरी सुरक्षा कवच, यासह कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Swapnil S

रायगड जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदानानंतरच्या ईव्हीएम मशिन्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाने नगरपरिषद-नगरपंचायतनिहाय स्ट्राँग रूमची अंतिम यादी जाहीर केली असून, या ठिकाणी २४ तास CCTV, पोलीस व SRPF चा तिहेरी सुरक्षा कवच, नियंत्रित प्रवेश आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना ठराविक वेळेत पाहणीची सुविधा यासह कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुरूड नगरपरिषद निवडणुकीनंतर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिन्स सीलबंद करून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून, प्रशासन मतमोजणीपर्यंत उच्च सुरक्षा व्यवस्था कायम ठेवणार आहे.

तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था

धनंजय कवठेकर / रायगड

आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदानोत्तर इव्हीएम मशिन्सची सुरक्षित साठवण आणि काटेकोर देखरेख सुनिश्चित करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने स्ट्राँग रूमची अंतिम यादी जाहीर केली आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही निगराणी, तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सर्व स्ट्राँग रूम उच्च सुरक्षा झोनमध्येच असतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

स्ट्राँग रूममध्ये मतदान यंत्रे सीलबंद!

संजय करडे/मुरूड-जंचिरा

मुरूड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यानंतर वापरलेली सर्व इव्हीएम मशिन्स नियमांनुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सीलबंद करून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली.मुरूड नगरपरिषद निवडणुकीत एकूण ११,५४४ मतदारांपैकी ८,५३० मतदारांनी मतदान करून सुमारे ७४% मतदान नोंदवले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असल्याने निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सर्वांची नजर मतमोजणीवर असून स्ट्राँग रूमवर पहारा अधिक कडक करण्यात आला आहे.

मुरूडमधील सुरक्षा

२४ तास सीसीटीव्ही पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० एसआरपी जवान, ८ जिल्हा पोलीस आणि २ अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती असा कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील स्ट्रॉंग रूम ठिकाणे

  • खोपोली नगरपरिषद - सेंट मेरीज हायस्कूल, चिंचवली DP रोड

  • अलिबाग नगरपरिषद - KES जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल, अलिबाग

  • पेण नगरपरिषद - कोकण एज्युकेशन सोसायटी, लिटल एंजल्स स्कूल, पेण

  • उरण नगरपरिषद - उरण नगर परिषद कार्यालय

  • मुरूड नगरपरिषद - तहसील कार्यालय, मुरूड

  • रोहा नगरपरिषद - जेठो नागरिक सभामंडप, रोहा

  • कर्जत नगरपरिषद - कर्जत नगर परिषद कार्यालय

  • माशेगाव नगरपंचायत - उप कोषागार कार्यालय, माशेगाव

  • श्रीवर्धन नगरपरिषद - तहसील कार्यालय, श्रीवर्धन

  • महाड नगरपरिषद - महाड नगर परिषद कार्यालय

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा पार! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद