राज-उद्धव एकत्र या! सेना भवनसमोर बॅनर्स झळकले; सेना भवनसमोर बॅनर्स झळकले स्क्रीन शॉट
महाराष्ट्र

राज-उद्धव एकत्र या! सेना भवनसमोर बॅनर्स झळकले

मुंबई मराठी माणसाची हे फक्त ऐकिवात राहिले आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला जातोय, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र या, अशी भावनिक साद घालणारे बॅनर्स दादर येथील सेना भवनासमोर झळकले.

Swapnil S

मुंबई : मुंबई मराठी माणसाची हे फक्त ऐकिवात राहिले आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला जातोय, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र या, अशी भावनिक साद घालणारे बॅनर्स दादर येथील सेना भवनासमोर झळकले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असल्याचा बॅनर्स झळकला असून मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच.

राज ठाकरे शिवसेनेतून जेव्हा बाहेर पडले तेव्हा राज्यात मोठा भूकंप झाला होता. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापन केली. मात्र आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा असून त्यासाठी त्यांना वेळोवेळी साद घातली जाते.

हीच भावनिक साद आता पुन्हा घालण्यात आली असून ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला एकत्रित फोटोही लावण्यात आला आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा उल्लेखही या बॅनर्सवर करण्यात आला आहे.

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात

Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद

व्यक्तिगत फ्लॅटधारकांना मालमत्ता पत्रिका मिळणार; राज्य सरकारचा लवकरच निर्णय