महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज ठाकरेंची व्यापाऱ्यांना तंबी ; म्हणाले, "सरकार कारवाई करेल ती करेल, पण..."

सर्वोच्च न्यायालाच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी न्यायालयाचे आभार मानले असून व्यापाऱ्यांना चांगलाच इशारा दिला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईतील दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात, यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जंगी आंदोलन केलं होतं. त्यानंतर मराठी पाट्यांच्या सक्तीविरोधात काही व्यापाऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश मुंबईसह राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले असून व्यापाऱ्यांना चांगलाच इशाराही दिला आहे.

"पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाबद्दल कोर्टाचे मनापासून आभार मानत राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच दुकानदारांनी नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच बरोबर इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका, अशी तंबीच राज यांनी व्यापाऱ्यांना दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

सर्वोच्च न्यायालयाने पुढील २ महिन्यांत मुंबईसह महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा स्पष्ट निकाल दिला. मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले आहेत. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं? तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे, असं राज म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवीच आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. इथलं सरकार यावर लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. 'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत, असं म्हणत राज यांनी व्यापाऱ्यांना चांगलीच तंबी दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी