सावंतवाडी स्थानकात राजधानीसह तीन एक्स्प्रेसला थांबा; गणेशोत्सवात चाकरमान्यांना मोठा दिलासा 
महाराष्ट्र

सावंतवाडी स्थानकात राजधानीसह तीन एक्स्प्रेसला थांबा; गणेशोत्सवात चाकरमान्यांना मोठा दिलासा

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर राजधानी एक्स्प्रेससह तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

सांवतवाडी : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर राजधानी एक्स्प्रेससह तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंजुरी मिळालेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी-मंगळुरू एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली गरीब रथ एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

कोरोना काळात राजधानी आणि गरीब रथ एक्स्प्रेसचे सावंतवाडी रोड स्थानकावरील थांबे बंद करण्यात आले होते. रेल्वे प्रवासी संघटनेचे विनोद नाईक-राणे यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका