महाराष्ट्र

नाशिक येथे अपघातात पालिका उपायुक्तांच्या पत्नीचा मृत्यू

मुंबईहून नाशिककडे जात असताना एका अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे एक कार महामार्गाजवळील नाल्यात जाऊन एका दरडीला धडकली.

Swapnil S

मुंबई : मुंबईहून नाशिककडे जात असताना एका अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे एक कार महामार्गाजवळील नाल्यात जाऊन एका दरडीला धडकली. या अपघातात मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत गायकवाड यांच्या पत्नी राजश्री प्रशांत गायकवाड (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

राजश्री प्रशांत गायकवाड आपल्या नातेवाईकांसोबत नाशिककडे जात असताना कसारा बायपासजवळील साईबाबा खिंड येथील उतारा दरम्यान कारला अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करतेवेळी कट मारली. यावेळी कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार नाल्यात जाऊन एका महाकाय दरडीवर आदळली. त्यात राजश्री प्रशांत गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मनोज शिलेदार यांचा पाय अडकून पडल्याने त्यांना दुखापत झाली. राजश्री गायकवाड यांना रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली