महाबळेश्वरात दुर्मिळ इंडोनेशियन ‘मलेओ’ पक्षी; स्थानिकांनी वाचवला जखमी पक्ष्याचा जीव 
महाराष्ट्र

महाबळेश्वरात दुर्मिळ इंडोनेशियन ‘मलेओ’ पक्षी; स्थानिकांनी वाचवला जखमी पक्ष्याचा जीव

महाबळेश्वरपासून जवळच असलेल्या कुंभरोशी परिसरात एक अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असा इंडोनेशियन ‘मलेओ’ पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रामभाऊ जगताप

रामभाऊ जगताप / कराड

महाबळेश्वरपासून जवळच असलेल्या कुंभरोशी परिसरात एक अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असा इंडोनेशियन ‘मलेओ’ पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर आढळणारा हा पक्षी स्थानिक शेतात सापडल्याने ही घटना विशेष लक्षवेधी ठरली आहे.

कुंभरोशी येथील शेतकरी शरद सावंत हे सायंकाळी आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना शेतात हा पक्षी जखमी अवस्थेत दिसून आला. या पक्ष्याची गंभीर अवस्था पाहून त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पक्ष्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. काही काळ उपचार करून त्याची निगराणी केल्यानंतर प्रकृती सुधारल्याने त्याला सुरक्षितपणे पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या दुर्मिळ पक्षाला जीवदान देण्यासाठी गावातील मनीष पवार, रुद्र बेलिडकर, गौरव बडोले, श्रेयश गारसुंड आणि शरद सावंत यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्ष्याचा जीव वाचवण्यात यश आले. तसेच मलेओ हा पक्षी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजनन पद्धतीसाठी ओळखला जातो. तो अंडी उबवण्यासाठी वाळू किंवा ज्वालामुखीय उष्णतेचा वापर करतो, जे निसर्गातील एक अद्भुत उदाहरण मानले जाते. मात्र अंड्यांची चोरी, शिकारी आणि जंगलतोड यामुळे या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून तो ‘अतिशय धोक्यात’ असलेल्या प्रजातींमध्ये गणला जातो.

स्थानिकांच्या जागरूकतेने वाचला अमूल्य जीव

महाबळेश्वर या डोंगरी, दुर्गम व डोंगर रांगा असलेल्या तालुक्यात वसलेल्या कुंभरोशी येथे या पक्ष्याचा आढळ हा दुर्मिळ प्रकार असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे आणि वन विभागाच्या त्वरित प्रतिसादामुळे एक अमूल्य जीव वाचल्याची भावना व्यक्त होत आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी