महाराष्ट्र

Maratha Reservation:मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर;पहिली सभा होईल इथं ...

ही सभा तब्बल 125 एकर शेतात होणार आहे. संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं या सभेची तयारी करण्यात येत आहे.

नवशक्ती Web Desk

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून उपोषण , प्रचार आणि मोर्चे सुरु आहेत. जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदत दिली आह . मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी गावातील सर्व महिलांनी मनोज जरांगेंचं औक्षण केलं . 23 नोव्हेंबरपर्यंत मनोज जरांगेंच्या महाराष्ट्रभरातील दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. दौऱ्यातली पहिली सभा आज सोलपुरातील वांगी येथे पार पडणार आहे. या दौऱ्याला सुरुवात करताना आंदोलक मनोज जरांगे यांनी 'ABP माझा'शी या वृत्त वाहिनीशी संवाद साधला. लोकशाहीच्या मार्गानं शांततेत आंदोलन सुरू आहे, आम्ही 24 डिसेंबरच्या आत मराठा आरक्षण मिळवणारच, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला 24 डिसेंबपर्यंतची मुदत दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आजपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा सुरु करणार आहेत. मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून इथून रवाना झाले आहेत. धाराशिवमधील परांडा आणि वाशी तालुक्यात त्यांची सभा होणार आहे, तर भूम तालुक्यातील ईट येथे त्यांची दुपारी 2 वाजता कॉर्नर सभा होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी मनोज जरांगेंची भव्य सभा होणार आहे. ही सभा तब्बल 125 एकर शेतात होणार आहे. संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं या सभेची तयारी करण्यात येत आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री