महाराष्ट्र

Ratnagiri : गणेशभक्तांवर चतुर्थीच्या तोंडावर विघ्न

मुंबई-गोवा महामार्ग अर्धवट कामामुळे धोकादायक बनला आहे. तर पावसाळ्यात तो अधिकच बिकट अवस्थेत असून गौरी गणपतीला येणाऱ्या कोकणवासीयांना जीव मुठीत धरून कोकणात यावे लागत आहे.

Swapnil S

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग अर्धवट कामामुळे धोकादायक बनला आहे. तर पावसाळ्यात तो अधिकच बिकट अवस्थेत असून गौरी गणपतीला येणाऱ्या कोकणवासीयांना जीव मुठीत धरून कोकणात यावे लागत आहे.

गेली अनेक वर्ष गौरी-गणपती आगमनावेळी बाप्पांचा प्रवास खड्ड्यामधून होत आहे. याही वेळी तीच परिस्थिती आहे. महामार्गाबरोबर गावोगावी जाणारे अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वाडीवस्तीवर जाताना अनेक अडचणींना सामोरे जात कोकणवासीयांना आपल्या घरांपर्यंत पोहचावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेकडो कोटी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते उखडले आहेत.

गणेशोत्सवाच्या ऐन धामधुमीत कोकणाकडे जाणाऱ्या कोकणवासीयांना लहान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शनिवारी मध्यरात्री कशेडी घाटात मालवणकडे जाणाऱ्या लक्झरी बसने पेट घेतला. चालकाच्या हुशारीमुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले. गौरी-गणपती सणासाठी हौसेने आणलेले साहित्य साधनसामग्री डेकोरेशनचे सामान आगीत भस्मसात झाले. पाठोपाठ चिपळूणमधील पूल कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी आहे. कोकण रेल्वे जादा गाड्यांसह फुल्ल झाली असल्याने अनेकांना स्पेशल एसटी बसेसची साथ मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील एसटी बस डेपोमधून गणपती स्पेशल बसेस सुटत आहेत. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्याने मुंबई पुण्याकडून येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाला अनेक अडथळे येताना दिसत आहेत. प्रवासादरम्यान त्यांना अनेक विघ्नांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी कोकणात येण्याचा प्रवास त्रास दायक बनला आहे.

चिपळूण तालुक्यात खडपोली एमआयडीसीकडे जाणारा जुना पूल कोसळला आहे. शनिवारी रात्री उशिरा घटना घडली. हा पूल जीर्ण झाल्याने कोसळला. त्यामुळे पिंपळी, खडपोली, दसपटी मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. डांबरीकरणाचे काम झटपट होत आहे. येत्या ४८ तासांत अत्यंत बिकट अवस्थेत असलेल्या रस्त्यांची डागडुजी हाती घेण्यात आली आहे.

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

पेट्रोलियम पदार्थांच्या भेसळीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; HC ने व्यक्त केली चिंता

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत! दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करणार : बावनकुळे