रत्नागिरीत पोलिसांची 'समुद्रभरारी'! QRT च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण; सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलीस दल सज्ज X| व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
महाराष्ट्र

रत्नागिरीत पोलिसांची 'समुद्रभरारी'! QRT च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण; सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलीस दल सज्ज

रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलीस दलाच्या क्विक रिस्पॉन्स टीममधील (क्यूआरटी) १८ जवानांना बोट सेलिंगचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Swapnil S

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलीस दलाच्या क्विक रिस्पॉन्स टीममधील (क्यूआरटी) १८ जवानांना बोट सेलिंगचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सागरी क्षेत्रातील आपत्कालीन परिस्थिती, बचावकार्य आणि विशेष मोहिमांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पोलिसांची सज्जता वाढणार आहे.

२ महाराष्ट्र नेव्हल युनिट (एनसीसी), रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित ‘द मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट (मेन्यू-२७)’ शिबिरांतर्गत हे प्रशिक्षण पार पडले. ७ ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भाट्ये समुद्रकिनारी आयोजित या शिबिरात १८ पोलीस जवानांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान त्यांना बोट सेलिंगचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे सागरी सुरक्षेसाठी पोलिसांची प्रतिसादक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या शिबिरासाठी २ महाराष्ट्र नेव्हल युनिट (एनसीसी), रत्नागिरीचे डेप्युटी कॅम्प कमांडंट विशाल भोसले, रत्नागिरी पोलीस दलाच्या सुरक्षा शाखेचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप यादव यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.

बोट सेलिंगच्या प्रशिक्षणामुळे क्यूआरटीच्या जवानांना सागरी भागात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली आहे. किनारपट्टीचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आवश्यकतेनुसार बचावकार्य राबविणे महत्त्वाचे

रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण सागरी किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील हालचालींवर लक्ष ठेवणे, समुद्रातील आपत्कालीन घटनांना तातडीने प्रतिसाद देणे आणि आवश्यकतेनुसार बचावकार्य राबविणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर क्यूआरटीच्या जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीत बोटीच्या सहाय्याने आवश्यक ठिकाणी पोहोचणे आणि विशेष मोहिमांमध्ये समन्वयाने काम करणे, यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले