रावसाहेब दानवेंच्या नातवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा 
महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंच्या नातवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा; भाजपच्या नेत्यानेच केली तक्रार

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवासह आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात दहा कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार भाजप पदाधिकारी कैलास आहिरे यांनी दाखल केली असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Swapnil S

नाशिक : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवासह आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात दहा कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार भाजप पदाधिकारी कैलास आहिरे यांनी दाखल केली असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, उद्योजक कैलास आहिरे यांच्या मालकीच्या कंपनीत दानवेंच्या नातू शिवम पाटील यांना भागीदारी देण्यात आली होती. या भागीदारीच्या बदल्यात एकूण २५ कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता. मात्र, त्यापैकी केवळ १५ कोटी रुपयेच अदा करण्यात आले, तर उर्वरित १० कोटींची रक्कम देण्यात आली नाही, असा आरोप आहिरे यांनी केला आहे.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, रावसाहेब दानवेंनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधत, “माझ्या नातवाला पार्टनर करा, मी सरकारी कामं मिळवून देईन, कंपनीची उलाढाल वाढवून देईन,” असे सांगितले होते. त्यांच्या प्रभावामुळे त्यांनी प्रस्ताव मान्य केला, मात्र नंतर आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

"घाण नका करू... हे भारत नाहीये"; नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना सुनावलं; गुटखा थुंकल्यानंतर रस्ता साफ करून घेतला, Video व्हायरल

ठाण्यात भटक्या श्वानांचा त्रास वाढला; ॲनिमल हेल्पलाइनवर १५८ तक्रारी

Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली

Mumbai : काँक्रीटीकरणाला डेडलाईन; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश