छगन भुजबळ  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटत नाहीत! ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

आरक्षण आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने एका वर्षात सर्वच प्रश्न सुटत नाही. सर्व प्रश्न असे सुटले असते तर आरक्षणाची गरज लागली नसती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

Swapnil S

नाशिक : आरक्षण आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने एका वर्षात सर्वच प्रश्न सुटत नाही. सर्व प्रश्न असे सुटले असते तर आरक्षणाची गरज लागली नसती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्याने भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. ते आपली नाराजी सतत व्यक्त करत आहेत. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मेळावा घेत ओबीसींचा एल्गार पुकारला आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन ओबीसींचा प्रश्न मांडणार आहोत, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, दलित, आदिवासींना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. कितीतरी दलित, आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटत नाहीत!

आदिवासी समाजातील पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी सापडतील. मात्र, आजही आपण झोपडपट्ट्यांत गेलो तर दलित आणि आदिवसीच सापडतात. पण भ्रम असा करून दिला आहे की, आरक्षण दिले म्हणजे घरावर सोन्याची कौल दिली पण तसे नाही, असे त्यांनी सांगितले.

म्हणून ओबीसींची एकगठ्ठा मते मिळाली

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी भुजबळ यांनी पंगा घेतला होता. मराठा नेत्याला अंगावर घेतल्याने महायुती सरकारला ओबीसींची मते एकगठ्ठा मिळाल्याची आठवण भुजबळ यांनी करुन दिली. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, परंतु राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका अजून बाकी आहेत, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाला आपला कधी विरोध नव्हता आपला विरोध केवळ आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका एवढाच आहे. आपल्याला सर्वच ब्राह्मणांनी काही विरोध केलेला नाही. आपले नेते महात्मा फुले यांना त्याकाळी ब्राह्मणांनी मदत केली आहे. पण काहींची मनोवृत्ती कोती असते. पण असे लोक थोडेच असतात जे सोबत असतात. मुलींच्या शाळेला विरोध करणारे तुमच्या आमच्यातीलच होते. आपल्याला शाळेला जागा देणारे ब्राह्मण समाजाचेही लोकही होते. त्यामुळे आपले दुश्मन सर्वच नाही. आपल्याला संपवायला निघाले आहेत त्यांना आपला विरोध आहे. ज्यांना हे समतेचे चक्र उलटे फिरवायचे आहे, त्यांनाच आपला विरोध असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात दौरे करणार

मंत्रि‍पदापेक्षा जी अवहेलना झाली. ती जास्त मनाला डाचत आहे. मला राज्यभरातून फोन येत आहेत. मी राज्यात व देशात दौरे करणार आहे. पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार आपण तयार करू, असे ते म्हणाले.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार