महाराष्ट्र

आरपीएफमुळे एकाला जीवदान; इगतपुरीतील रेल्वे कर्मचारी बचावला

कसारा येथील आरपीएफ चमूमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचण्यात यश आले आहे.

Swapnil S

मुंबई : कसारा येथील आरपीएफ चमूमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचण्यात यश आले आहे.१ जानेवारी रोजी कसारा येथील आरपीएफ पोस्टला वरिष्ठ विभाग अभियंता/पर्मनंट-वे अंकित गर्ग यांच्याकडून रेल्वे रुळांच्या बाजूने एक व्यक्ती पडल्याचा संदेश प्राप्त झाला होता. आरपीएफचे उपनिरीक्षक राम लखन कुमार त्यांच्या चमूसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. चमूने त्वरित त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेले व त्याला पुढील उपचारासाठी दाखल केले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्या व्यक्तीचे नाव सोमनाथ एकनाथ शिंदे असे असून तो इगतपुरी येथील रहिवासी आणि भांडुप युनिट क्रमांक १, ट्रॅक मेंटेनर म्हणून कार्यरत असलेला रेल्वे कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले.  शिंदे यांनी तपास पथकाला माहिती दिली की, ते कामावरून घरी परतत असताना उंबरमाळी येथे उतरले होते. महामार्गावर असताना त्यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून लुटले व नंतर फेकून दिले.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य