रूपाली चाकणकर संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक येथील लैंगिक अत्‍याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्‍याबरोबर पूर्वी असलेल्‍या ओळखीतून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील, अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : नाशिक येथील लैंगिक अत्‍याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्‍याबरोबर पूर्वी असलेल्‍या ओळखीतून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील, अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद गोरे, सपना राऊत यांच्यासह इतर व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपाली निलेश चाकणकर (४३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील एका मंदिराशी संबंधित अशोक एकनाथ खरात यांच्याशी चाकणकर यांची सुमारे नऊ वर्षांपूर्वी सामाजिक कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर मंदिरातील विविध कार्यक्रमांसाठी त्या तेथे जात होत्‍या. दरम्यान, १८ मार्च २०२६ रोजी अशोक खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर चाकणकर आणि खरात यांचे सार्वजनिक कार्यक्रमांतील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. २० मार्चपासून सामाजिक माध्यमांवर संगिता तिवारी, ॲड. अशोक बेदरे रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे तसेच दिपाली सय्यद यांच्‍यासह इतरांनी चाकणकर यांच्‍याबाबात पोस्‍ट केल्‍या. त्यावर मिलिंद गोरे आणि सपना राऊत यांनी व इतरांनी अश्लिल व अपमानस्पद शेरेबाजी केली होती.

या सर्व प्रकारामुळे चाकणकर यांना मानसिक त्रास सहन करावा लागता. तसेच त्‍यांच्‍या प्रतिष्ठेस धक्‍का पोहचल्‍याचे त्‍यांनी आता थेट सायरबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्‍यानुसार हा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्सचे स्क्रीनशॉट तसेच इतर कागदपत्रे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान