विजय वडेट्टीवार  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

'मोठ्या माशां'वर कारवाई करा - वडेट्टीवार

बलात्काराचा आरोप असलेल्या अशोक खरात या भोंदूबाबाशी असलेल्या संबंधांवरून रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Swapnil S

मुंबई: बलात्काराचा आरोप असलेल्या अशोक खरात या भोंदूबाबाशी असलेल्या संबंधांवरून रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र चाकणकरांचा राजीनामा म्हणजे केवळ मलमपट्टी असून, या प्रकरणातील 'मोठ्या माशां'चा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केली.

'त्यां'ना कोणाचे अभय

नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले की, केवळ राजीनामा देऊन हे प्रकरण संपत नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे गंभीर प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. अशोक खरात याच्याशी कोणत्या मंत्र्यांचे आणि बड्या नेत्यांचे हितसंबंध होते, हे समोर येणे गरजेचे आहे.

सीडीआर तपासा

अशोक खरात याच्या संपर्कात असलेल्या सर्व मंत्र्यांचे आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासले जावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी लावून धरली आहे. खरातकडे असलेली अफाट संपत्ती आणि त्याला मिळणारा राजाश्रय पाहता, काही विशिष्ट लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसते, असेही ते म्हणाले.

वर्गात मोबाईलला बंदी! जगातील निम्म्याहून अधिक देशांनी घेतला मोठा निर्णय; UNESCO अहवालातून उघड

मुंबईत वॉटर मेट्रो येणार? कल्याण-गेटवे ३४० किमी मार्ग; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

पाळीव मांजर ठेवण्यास कुटुंबीयांचा विरोध; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त