रायगडच्या नगरसेविकेचे पद अखेर धोक्यात; बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी याचिका फेटाळली 
महाराष्ट्र

रायगडच्या नगरसेविकेचे पद अखेर धोक्यात; बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी याचिका फेटाळली

बनावट दस्तावेज सादर करून 'कुणबी' (ओबीसी) जातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रूपाली शिगवण या नगरसेविकेला उच्च न्यायालयाने झटका दिला.

Swapnil S

मुंबई : बनावट दस्तावेज सादर करून 'कुणबी' (ओबीसी) जातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रूपाली शिगवण या नगरसेविकेला उच्च न्यायालयाने झटका दिला. खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाऱ्यांना न्यायालय कोणताही दिलासा देऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत न्या. आर. आय. छागला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या खंडपीठाने रूपाली शिगवण यांची याचिका फेटाळून लावली.

शिगवण या डिसेंबर २०२५ मध्ये रायगड येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ८ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. निवडणुकीसाठी त्यांनी महाड उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेले 'कुणबी' जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, निवडणुकीत पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवाराने या प्रमाणपत्राला रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर आव्हान दिले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Borivali- Virar Railway : विस्तारीकरणासाठी रेल्वेचे PVD तंत्रज्ञान; जमिनीच्या मजबुतीकरणाचा कालावधी सहा महिन्यांवर

भारतात येत्या नऊ वर्षात २० कोटी एअर कंडिशनर वाढणार; जागतिक ऊर्जा मागणीत घडणार मोठा बदल

मीरा-भाईंदरच्या परिवहन ताफ्यात ४२ वातानुकूलित ई-बसेस दाखल; RTO नोंदणी प्रक्रिया सुरू; लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार

Mumbai : 'त्या' उद्यान कंत्राटदाराला लाखाचा दंड

Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच