महाराष्ट्र

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ नोव्हेंबर पर्यंत इंटरनेट सेवा बंद; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतला निर्णय....

नवशक्ती Web Desk

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी हिंसक रूपं धारणं केलं आहे. राज्यभरात तीव्र आंदोलन सुरु आहे. मराठवाड्यात आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ, रास्ता अडवून आंदोलन न करत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर वगळता जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला आता राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण सुरु झालं आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या आहे. म्हणून आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर वगळता गंगापूर, वैजापूर, खुलदाबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव या तालुक्यातील इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. फक्त संभाजीनगर शहरात इंटरनेट सेवा सुरु राहणार असून मात्र, कुठ ही काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारनं इंटरनेट सेवांवर निर्बंध घातला आहे. त्यानुसार आजपासून ते 03 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 48 तासांपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra HSC 12th Result 2024: यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल तर 'या' विभागाचा सर्वात कमी निकाल!

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास 'हा' संघ थेट फायनलमध्ये; आज ठरणार अंतिम फेरीचा पहिला मानकरी

नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात