महाराष्ट्र

सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी; काँग्रेसला धक्का, अपक्ष लढणार

सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Swapnil S

सांगली : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांच्या भावाने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. अखेर त्यांनी आता अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने मविआ व काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत. त्यातच विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने पाच उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित मानली जात आहे. तसेच, ‘वसंतदादा आघाडी’ नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. विशाल पाटील हे शुक्रवारीच अर्ज दाखल करणार होते. परंतु तांत्रिक कारणामुळे ते आता सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढायचीच, असा निर्धारच त्यांनी केला आहे.

पटोलेंच्या दाैऱ्यावर बहिष्काराचे सावट

सांगलीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तालुका न्याय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लढण्याची भूमिका विशाल पाटील यांनी घ्यावी, अशी आग्रहाची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा आहे. या दौऱ्यावर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत