महाराष्ट्र

भाजपमध्ये प्रवेश, कर्जाला हमीदेखील! अजित पवारांचा संग्राम थोपटेंच्या कारखान्याला विरोध

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संग्राम थोपटे यांचा साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला असता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर तीन-चार महिने होतात तेच त्यांच्या साखर कारखान्यासाठी ४०२ कोटी ९० लाखांच्या कर्जाला हमी देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संग्राम थोपटे यांचा साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला असता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर तीन-चार महिने होतात तेच त्यांच्या साखर कारखान्यासाठी ४०२ कोटी ९० लाखांच्या कर्जाला हमी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाला विरोध दर्शविल्याचे समजते. मार्जिन मनी लोन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापुर्वी राजगड साखर कारखान्याने केंद्र सरकारकडून प्रकल्प विस्तारी करणासाठी आवश्यक असणारी मंजुरी घ्यावी.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूर्वपरवानगी घ्यावी. त्याचबरोबर २५ जून, २०२५ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करावे, या अटींवर कारखान्या प्रस्तावावर मान्यता देण्यात आली आहे.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी