संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

"तेच मशीन, तीच सेटिंग अन् तोच पैसा..." निवडणुकांच्या निकालावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची मतमोजणी आज (२१ डिसेंबर) सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली होती. या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या निकालांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Swapnil S

राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची मतमोजणी आज (२१ डिसेंबर) सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली होती. या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकांमध्ये महायुतीतीलच काही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते, त्यामुळे या निकालांना राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व दिलं जात आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या निकालांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

"तेच मशीन, तीच सेटिंग आणि तोच पैसा"

ते म्हणाले की, "विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे आकडे होते, तेच आकडे पुन्हा इथेही दिसत आहेत. भाजप, अजित पवार गट आणि इतरांचे आकडे जसेच्या तसे आहेत," असा आरोप त्यांनी केला. “तेच मशीन, तीच सेटिंग आणि तोच पैसा वापरला गेला आहे. आकड्यांमध्ये जराही बदल दिसत नाही,” असं राऊत म्हणाले.

३० कोटींच्या बजेटच्या नगरपालिकेसाठी शंभर ते दीडशे कोटी रुपये केले खर्च

तसंच, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात पैसा वापरल्याचा आरोप करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. “३० कोटींच्या बजेटच्या नगरपालिकेसाठी शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आतापर्यंत नगरपालिकांच्या निवडणुकीत चार्टर फ्लाइट आणि हेलिकॉप्टर वापरल्याचं कधी पाहिलं नव्हतं,” असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल