महाराष्ट्र

"देवेंद्र फडणवीसांना अटक करा..." संजय राऊतांची मागणी

Suraj Sakunde

काल पुण्यात झालेल्या भाजप मेळाव्यात फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. विधानपरिषद निवडणुकीत विरोधकांचे २० आमदार आमच्याकडे आले होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून आता संजय राऊतांनी भाजपला चांगलंच घेरलंय. देवेंद्र फडणवीस यांना अटक करून त्यांची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांचं जोरदार प्रत्युत्तर-

संजय राऊत म्हणाले की,"पैसा फेको, तमाशा देखो...फडणवीस म्हणतायत महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले, चिंचोके देऊन फोडले का? अटक करा देवेंद्र फडणवीसांना...गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना? २० आमदार फोडले, किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी? चौकशी करा. देवेंद्र फडणवीसांच्या मागे ईडी, सीबीआय लावा. गृहमंत्री अमित शहा... तुम्ही जर सच्चे असाल ना, तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा. वीस आमदार फोडले हे गर्वानं सांगतो. ही त्यांची लायकी. गृहमंत्री सांगतो मी २० आमदार फोडले. फुकट फोडले का की दही-भात देऊन फोडले? किती दिले? ५०-५० कोटी रुपये दिलेत त्या आमदारांना..."

संजय राऊत पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा....ही कुठली भाषा? इतका पराभव तुमच्या आरपार गेलाय? देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेला त्यांच्याच नागपूरात पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ठोकशाहीची भाषा करतायत."

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

काल पुण्यात झालेल्या भाजप मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी नुसती टाचणी लावली ना, तर हा फुगा फुटू शकतो. हा फुगा फोडण्याची सुरुवात विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही केलीये. आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला. हे सांगत होते, महायुतीची मतं फुटणार. महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत...अरे महायुतीचे सोडा, तुमचेच २० आमदार आमच्याकडे कधी आले, ते तुम्हाला समजलं नाही. हा फुगा फुटलाय."

"मी तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटींग करायचीये त्यानं बॅटींग करा. अट एकच आहे, हिट विकेट व्हायचं नाही. सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले, तर समोरच्याला बोलण्याऐवजी आपल्यालाच बोलून जातात. असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात. तेवढं सोडून काहीही करा. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा,"असं फडणवीस म्हणाले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था