महाराष्ट्र

कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस-राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरे घाबरले म्हणून ते आले नाहीत, असा टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यावर उबाठा नेते संजय राऊत यांनी पलटवार केला.

Swapnil S

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरे घाबरले म्हणून ते आले नाहीत, असा टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यावर उबाठा नेते संजय राऊत यांनी पलटवार केला. ते म्हणाले, त्याला नीट धोतर नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय. कोश्यारी हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणारा हा माणूस आहे. त्याला भाजपने पद्मभूषण दिले. त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी जोड्याने मारले असते, अशी टीका त्यांनी केली.

...तर त्यांनी कोश्यारींना खूप चोपला असता

भगत सिंह आज जर असते तर त्या कोश्यारीला खूप चोपला असता. त्या कोश्यारीने पहिले नाव बदलावे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोश्यारी यांच्यावर टीका केली. दरम्यान, चंद्रपूर पालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे कि, उबाठा गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत, असा दावा देशपांडेंनी केला. याबाबत राऊतांना अंधारात ठेवले की, त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा