शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्या पालकांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेतली.. X |ANI
महाराष्ट्र

दीपकेंना सुरक्षा व्यवस्था देण्याची गरज - संजय शिरसाट

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा व्यवस्था मिळाली पाहिजे, अशी मागणी मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी रविवारी केली.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा व्यवस्था मिळाली पाहिजे, अशी मागणी मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी रविवारी केली.

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज एमआयडीसी परिसरात दीपके यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपले दीपके यांच्याशी २५ वर्षांपासून कौटुंबिक संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनाच्या काळात आपण या कुटुंबाला भेटण्याचे टाळले, कारण त्यावेळी त्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले गेले असते संबंध जोडला गेला असता असेही ते म्हणाले.

आंदोलन मागे घेतल्यानंतरही टायफॉइड झाल्यामुळे अभिजित दीपके अद्याप घरी परतलेले नाहीत, तरी त्यांना संरक्षण दिले पाहिजे, असे शिरसाट म्हणाले.

त्यांचे आई-वडील चिंतेत होते, कारण प्रत्येक पालकाला आपली मुले सुरक्षित राहावी असेच वाटते. ते माझ्या कुटुंबासारखे आहेत आणि मी येथे केवळ पालकमंत्री म्हणून आलो नव्हतो. अभिजित महाराष्ट्रात पोहोचल्यावर त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे,” असे शिरसाट म्हणाले.

ते आधी दीपके यांच्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत कारण त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले असते. शिरसाट यांनी सांगितले की, ते दीपके कुटुंबाला २५ वर्षांहून अधिक काळापासून ओळखतात, असे ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका! दीपके, रांका, दास यांची विमानातच धरपकड; चार माजी मुख्यमंत्र्यांना केले स्थानबद्ध, दिल्लीत सात हजार आंदोलक ताब्यात

ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

Navratri 2026 Wishes : 'उदे गं अंबे उदे!' नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश अन् HD कार्ड्स

Navratri 2026 : नवरात्रीचे नऊ दिवस अन् देवीची नऊ रूपं! प्रत्येक रूपामागे दडलाय खास अर्थ, तुम्हाला माहीत आहे का?