महाराष्ट्र

भारत विश्वगुरू होऊ दे! गोदातीरी पंतप्रधानांकडून गंगापूजनावेळी संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.

Swapnil S

प्रतिनिधी/नाशिक : दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीतीरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रामतीर्थ येथे दर्शन घेत गंगापूजन केले. भारत विश्वगुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर अभंग आणि भावार्थ रामायणातील आठव्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे