एक्स @SureshDhasBJP
महाराष्ट्र

लवकर न्याय हवा! पुण्यातील जनआक्रोश मोर्चात वैभवी देशमुखची मागणी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पुणे शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

Swapnil S

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पुणे शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व पक्षांतील, जातीधर्मातील नागरिक सहभागी झाले होते. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली. त्याप्रमाणे इतर कोणाचीही हत्या व्हायला नको. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने केली.

पुण्यातील लालमहाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. लालमहाल, फडके हौद, दारुवाला पूल, अपोलो थेटर, केईएम रुग्णालय, समर्थ पोलीस स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून हा मोर्चा निघाला. या सर्वपक्षीय मोर्चामध्ये मनोज जरांगे-पाटील, आमदार सुरेश धस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, ज्योती मेटे व अन्य सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, या मोर्चाला पुण्याचेच आमदार उपस्थित नसले, तरी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्याचबरोबर परभणी हिंसाचारात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी पुण्यातील जनआक्रोश मोर्चातून करण्यात आली.

ही सर्व संघटित गुन्हेगारी आहे आणि यावर कायमचा अंकुश लावून महाराष्ट्राला आदर्श दाखवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आणि अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. त्यांना न्याय देता येत नसेल, तर माझा भाऊ मला परत द्या, अशी मागणी मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी केली. “या प्रकरणातील सर्व आरोपींचा सीडीआर बाहेर काढा. गुन्हेगारांची कोणीही पाठराखण करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींवर १५ ते २० गुन्हे दाखल आहेत. मात्र त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. त्यांना कोणी पाठीराखे होते म्हणूनच या घटना घडल्या का?,” असा सवालही त्यांनी विचारला.

राजकारणासाठी अशा घटनांचा वापर होता कामा नये

एक चांगल्या आणि लोकप्रिय सरपंचाची हत्या झाली आहे. मात्र त्याचा उपयोग राजकारणासाठी कोणीही करू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्या. आरोपींना मदत करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार आहोत. मात्र, राजकारणासाठी अशा घटनांचा वापर होता कामा नये. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत. बीड प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत