कराड : कोरेगाव येथे बोगस कॉल सेंटर चालवत अमेरिकन नागरिकांची डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक करणाऱ्या मुंबईतील २१ जणांची टोळी साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गजाआड केले.
२२ मे रोजी मध्यरात्री कोरेगाव येथील रिलायबल अपार्टमेंटमधील 'श्रीसाई लॉजिस्टिक्स अॅण्ड कन्सल्टंस' नावाने चालविण्यात येत असलेल्या बोगस कॉल सेंटर छापा मारत पोलिसांनी केलेल्या कारवाईत १७ इसमांसह व ४ महिलांना जेरबंद केले. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी हा श्रीसाई लॉजिस्टिक्स अॅन्ड कन्सल्टंस हे बोगस कॉल सेंटर चालवत आहे. अमेरिकन नागरिकांची तो फसवणूक करत होता. याबाबतची माहिती कळताच पोलीस निरीक्षक घोडके यांनी
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्यासाठी विशेष पथक तयार केले. सदर पथकाला सोबत घेत २२ रोजी मध्यरात्री १ वा. च्या सुमारास वरील ठिकाणी छापा टाकला. यावेळी तेथे १७इसम व ४ महिला बेकायदेशिरपणे बोगस नावाचे कॉल सेंटरद्वारे वरीलप्रमाणे अमेरिकन नागरिकांशी ऑनलाइन अॅपद्वारे संपर्क साधून, त्यांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी, वीरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनिष जोशी, शमशुद्दीन सफाट सय्यद, गौरव भानुदास लांडगे, अभिषेक संजय गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहाण, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दीपक खंडारे, मोहंमद शफिक सलीम कोकणे, ओमकार संजय घार्गे, दिपेन विवेक जाधव, लेबीन लारसन सायमन यांच्यासह चार महिला संशयित आरोपींचा समावेश आहे.