महाराष्ट्र

प्रतिष्ठित डॉक्टरला हनिट्रॅपमध्ये अडकवून १ कोटींची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक; सातारा जिल्ह्यातील घटना

सातारा जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित खासगी डॉक्टरांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवित व्हिडीओ पाठवून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित खासगी डॉक्टरांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवित व्हिडीओ पाठवून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी सापळा रचत आवळल्या असल्याची घटना घडली. यामध्ये पैसे घेण्याकरिता आलेल्या २ युवकांना शिरवळ पोलीसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार सध्या फरार आहे. दरम्यान, शिरवळ पोलीसांच्या पथकाकडून सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नितीन नवनाथ प्रधान (२०),दत्ता आप्पाराव घुगे(२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक प्रतिष्ठित खासगी डॉक्टर यांचा शिरवळ परिसरातील गावांमध्ये दवाखाना आहे.

दरम्यान, संबंधित खासगी डॉक्टर यांच्याकडे कामाकरिता असलेल्या एका महिलेची नातेवाईक असलेली एक साधारण १९ वर्षीय युवती वैद्यकीय सेवेकरिता असताना अचानकपणे बेपत्ता झाली. याबाबतची बेपत्ता असल्याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी खासगी डॉक्टर यांच्या मोबाईलवर संबंधित युवतीबरोबरचा एक व्हिडीओ आला आणि डॉक्टरांकडून १ कोटींची मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित खासगी डॉक्टरांना हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे निदर्शनास येताच फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्याकडे तक्रार दाखल केली.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल