कराड : सातारा जिल्ह्यातील वेळू (ता. कोरेगाव) गावातील सुखदेव तात्या भोसले यांचे दहा वर्षांपूर्वीचे 'पहिला मारला की पाणी!' हे शब्द आजही गावातील जलसंधारणाच्या यशाची साक्ष देत आहेत. २०१६ मध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या य गावाने श्रमदान, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांचे सकारात्मक परिणाम दशकानंतरही अनुभवले जात आहेत.
२०१६ मध्ये अवघ्या ४५ दिवसांत ग्रामस्थांनी गावात जलसंधारणाची प्रभावी कामे केली. या कामगिरीबद्दल गावाला प्रथम क्रमांकाचे ५० लाख रुपयांचे बक्षीस, तर मुख्यमंत्र्यांकडून २० यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले होते. डॉ. अविनाश पोळ कामांनी गावाच्या पाणी व्यवस्थापनाला नवी दिशा दिली. विशेष म्हणजे, या परिसरात वर्षाला अवघा १८० मिलिमीटर पाऊस पडत असतानाही जलसंधारणाच्या कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. परिणामी ओढे, तलाव, बंधारे आणि विहिरींमध्ये पाण्याची उपलब्धता वाढली आहे. हातपंपाला एक-दोन वेळा उपसा मारताच पाणी उपलब्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कमी पर्जन्यमान असलेल्या भागातही योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्नांतून जलसमृद्धी साधता येते, हे वेळू गावाने दाखवून दिले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाबरोबरच वृक्षसंवर्धन आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. वेळू गावाचा हा प्रयोग इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या संकल्पनेची ताकद या गावाने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे.
या, पाहा आणि तुम्हीही करून दाखवा !
दुष्काळाच्या झळा सोसलेल्या वेळू गावाने श्रमदान, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून जलसंधारण, वृक्षसंवर्धन तसेच उपलब्ध पाण्याचा ताळेबंद व नियोजन केले. दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम आजही दिसत आहेत. इतर गावांनीही वेळूला भेट देऊन ही कामे पाहावीत आणि आपल्या गावात असे प्रयत्न करावेत. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन वेळू येथील सामाजिक कार्यकर्ते सुखदेव भोसले यांनी 'नवशक्ति' आणि 'एफपीजे 'शी बोलताना केले.