महाराष्ट्र

यूपीएससीच्या अभियांत्रिकी सेवेत सौरभ गवंडे महाराष्ट्रात पहिला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिनवनगर येथील सौरभ संदीप गवंडे यूपीएससीच्या अभियांत्रिकी सेवेत घवघवीत यश संपादन करत देशात १७ वा, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

Swapnil S

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिनवनगर येथील सौरभ संदीप गवंडे यूपीएससीच्या अभियांत्रिकी सेवेत घवघवीत यश संपादन करत देशात १७ वा, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सौरभ याचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण कुडाळ येथील पडतेवाडी प्राथमिक शाळेत, तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथीलच कुडाळ हायस्कूल येथे पूर्ण झाले. त्यानंतर सौरभने व्हीजेटीआय (मुंबई) येथे बी टेक (सिव्हिल - इंजिनीअर्स) पूर्ण केले.

सध्या तो चंदीगड येथे इंडीयन ऑईल कंपनीत ग्रेड- ए अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सौरभने कोणतीही शिकवणी वर्ग न लावता स्वतःच्या बुद्धिमतेच्या व अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सौरभ हा कोकण रेल्वेचे सिग्नल इंजिनिअर संदीप गवंडे व सेवानिवृत्त पोस्टल असिस्टंट सुषमा गवंडे यांचा मुलगा होय.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती