जीव देऊ, पण झाडे तोडू देणार नाही; अभिनेते सयाजी शिंदे यांचा इशारा छायाचित्र : तेजल घोरपडे
महाराष्ट्र

जीव देऊ, पण झाडे तोडू देणार नाही; अभिनेते सयाजी शिंदे यांचा इशारा

नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या दरम्यान तपोवन परिसरातील १८०० झाडे तोडली जाणार असल्याने नाशिककर संतप्त झाले आहे. नाशिककरांच्या लढ्यात आता अभिनेते व 'सह्याद्री देवराई' संघटनेचे प्रमुख सयाजी शिंदे सामील झाले आहे. गरज पडल्यास आम्ही जीव देऊ, पण झाडे कापायला देणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

Swapnil S

नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या दरम्यान तपोवन परिसरातील १८०० झाडे तोडली जाणार असल्याने नाशिककर संतप्त झाले आहे. नाशिककरांच्या लढ्यात आता अभिनेते व 'सह्याद्री देवराई' संघटनेचे प्रमुख सयाजी शिंदे सामील झाले आहे. गरज पडल्यास आम्ही जीव देऊ, पण झाडे कापायला देणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी १८०० झाडे नाशिककरांनी जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कापण्यास देण्यासाठी सयाजी शिंदे हे शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी झाडे तोडण्यास कडाडून विरोध केला.

२२० कोटींच्या निविदेबाबत सवाल उठवताना ते म्हणाले की, झाडे कोणत्याही परिस्थितीत कापू नका. माझी गरज लागल्यास मला बोलवा. मी त्वरित तुमच्यासाठी धावून येईन. झाडे ही आपली आई-वडिल आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. मी जीव देईन, पण एकही झाड कापायला देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

नाशिककरांना ते म्हणाले की, गरज पडल्यास मी स्वतः नाशिकच्या नागरिकांसोबत उभा राहिन.

तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यासारख्या संत-महापुरुषांनी नेहमीच निसर्गरक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे आणि ते स्वतःही त्याच विचारांचे आहेत. त्यांच्या मते, झाडे आपल्या आई-वडिलांसारखीच आहेत. 'कोणी आपल्या आई-वडिलांना इजा करत असेल, तर आपण शांत कसे बसू ?' असे त्यांनी विचारले.

साधुग्राम मोकळ्या जागेत उभारावे

ते म्हणाले की, झाडे वाचतील तर आपण वाचू, यात काही मोठी गोष्ट किंवा तंत्र समजून घेण्याची गरज नाही. सध्या फॉर्म भरणे, स्वाक्षऱ्या करणे किंवा कोणत्याही तांत्रिक प्रक्रियेत वेळ घालवण्याची वेळ नाही, पण जे लोक कायदेशीर मार्गाने झाडे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते पूर्णपणे त्यांच्या सोबत आहेत. जर साधुग्राम उभारायचाच असेल, तर तो कोणत्यातरी मोकळ्या जागेवर उभारावा, झाडे तोडून नाही. यामुळे लोकांचंही भलं होईल आणि निसर्गाचंही, असे त्यांनी सांगितले.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...