(संग्रहित छायाचित्र, ANI)
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या सभेनंतर आघाडीचे जागावाटप जाहीर होणार - संजय राऊत

वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहे. त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामध्ये अकोला आणि इतर तीन मतदारसंघाचा समावेश आहे. त्यावर...

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. एकट्या भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीरही केली आहे; मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण आघाडीत कोणतेही मतभेद नसून जवळपास सर्वच जागांवर एकमत झाले आहे. तिन्ही पक्ष एकत्र लढण्यावर ठाम आहेत. येत्या रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेनंतर आघाडीतील जागवाटपांची घोषणा केली जाईल, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. आघाडीतील जागावाटप पूर्ण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे एक-दोन जागेवर वाद आहे. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच जास्त चुरस असते त्यामधून खेळ सुरु होतो. पण वरिष्ठ पातळीवर एकत्र लढण्यावर एकमत आहे, असे राऊत म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहे. त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामध्ये अकोला आणि इतर तीन मतदारसंघाचा समावेश आहे. त्यावर त्यांनी विचार करून निर्णय घ्यायचा आहे. समाज माध्यमातून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा होत नाही. आम्ही कधीही केली नाही आणि करत सुध्दा नाही, असा खोचक सल्लाही राऊत यांनी दिला. दरम्यान, महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश झालेला नाही. त्यासंदर्भात कोणीही, कधीही चर्चा केलेली नाही, असेही राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

देशातील तसेच महाराष्ट्रातील दलित, वंचित व मुस्लिम मतदार यांना हुकूमशाहीचा तसेच संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्यांचा पराभव करायचा आहे. त्यामुळे भाजपाला अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पक्षांच्या पाठीशी दलित, वंचित व मुस्लिम मतदार उभे राहणार नाहीत, असे राऊत म्हणाले. ज्यांनी या देशाला संविधान दिले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्या नावाने राजकारण करणारे कोणीही असू देत त्यांनी डॉ. आंबेडकरांना लहान करू नये, ही त्यांच्या समाजाची भावना आहे, हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश