महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपींची मालमत्ता जप्त करा; विशेष एनआयए न्यायालयाचे आदेश

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एनआयएचे विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ हे काम पाहत आहेत.

Swapnil S

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी रामचंद्र कालसंग्राची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी दिले. वॉरंट तसेच फरार घोषित केल्यानंतरही आरोपी कालसंग्रा न्यायालयात हजर राहिला नाही. या पार्श्वभूमीवर विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी मध्य प्रदेशातील शहजानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कालसंग्राची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. त्यात सहा लोकांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह एकूण १३ आरोपी होते. त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे, तर रामचंद्र गोपालसिंग कालसंग्रा उर्फ ​​रामजी उर्फ ​​ओमजी उर्फ ​​पटेल आणि संदीप डांगे हे दोघे फरार आहेत. कालसंग्राविरुद्ध विविध बॉम्बस्फोट प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. समझोता एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोट, २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट आणि २००७ मधील हैदराबादच्या मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात कालसंग्राचा सहभाग होता, असा आरोप आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एनआयएचे विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ आणि अनुश्री रसाळ हे काम पाहत आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी