ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. जनार्दन - वाघमारे यांचे निधन Photo : X
महाराष्ट्र

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. जनार्दन - वाघमारे यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी सकाळी लातूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. डॉ. वाघमारे यांना २४ जानेवारीला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते...

Swapnil S

लातूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी सकाळी लातूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. डॉ. वाघमारे यांना २४ जानेवारीला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता त्यांनी येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.

शिक्षण, साहित्य आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाबद्दल त्यांना सर्वत्र मान्यता मिळाली होती. डॉ. वाघमारे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक आणि कुलगुरू होते. त्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी 'लातूर पॅटर्न'चे शिल्पकार मानले जात असे.

डॉ. वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी चाकूर तहसीलमधील जानवल गावात झाला. ते २००८ ते २०१४ या कालावधीत राज्यसभा सदस्य होते, तर २००१ ते २००६ दरम्यान त्यांनी लातूर नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. शिक्षण आणि साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार आणि अनेक सरकारी सन्मान मिळाले. वाघमारे यांनी महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले. मंगळवारी जिल्ह्यातील कवठा गावात त्यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

शरद पवारांकडून श्रद्धांजली

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च स्थान मिळवून देणारे लातूर पॅटर्न शैलीचे शिल्पकार आणि मराठवाडा एज्युकेशन कोन्क्लेव्ह २०२५ चे मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख अजरामर आहे. वाघमारे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली !' असे शरद पवार यांनी ट्रीट केले आहे.

पालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त

दरम्यान, लातूरचे पालकमंत्री डॉ. शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी डॉ. वाघमारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने एक तत्त्वनिष्ठ मार्गदर्शक, अभ्यासू नेतृत्व आणि समाजाला दिशा देणारा विचारवंत आपण गमावला आहे, असे भोसले यांनी म्हटले आहे.

दुबईत अडकलेल्या भारतीयांना दिलासा; मध्यपूर्व तणावानंतर उड्डाणाला सुरुवात, प्रवासी मुंबईत दाखल, Video

मध्यपूर्व संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारकडून व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य...

"कृपया मला मदत करा…"; विशाखा सुभेदारांचा मुलगा अडकला कुवेतमध्ये, अभिनेत्रीला अश्रू अनावर; Video

Mumbai : लोकलला बांधून नेलं होळीचं झाड; विरार ते माहीम जल्लोषमय प्रवास, कोळी बांधवांची अनोखी परंपरा चर्चेत; Video

Iran vs Israel-US War : सौदीच्या रियाधमध्ये इराणी ड्रोनचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, भीषण आगीचा Video व्हायरल