कोल्हापूर : ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास (Photo-X)
महाराष्ट्र

कोल्हापूर : ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Anil Mehta Passes Away : ज्येष्ठ प्रकाशक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल धोंडीलाल मेहता यांचे शनिवारी निधन झाले.

Swapnil S

कोल्हापूर : ज्येष्ठ प्रकाशक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल धोंडीलाल मेहता यांचे शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी शर्मिला, नातवंडे असा परिवार आहे. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल मेहता हे पुणे येथे बीकॉमचे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापुरात आले. त्यांनी १९६४ मध्ये पुस्तक विक्री व्यवसाय सुरू केला. बंधू उल्हास मेहता यांच्यासमवेत १९६५ मध्ये कोल्हापुरात 'अजब पुस्तकालय' हे दुकान सुरू केले. पुढे १९७६ मध्ये पुणे येथे त्यांनी मेहता पब्लिशिंग हाऊस ही संस्था सुरू केली.

डॉ. आनंद यादव यांच्या 'मळ्यावरची मैना' या कथासंग्रहापासून या संस्थेचा प्रवास सुरू झाला. वि. स. खांडेकर, रणजित देसाई, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, व. पु. काळे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके, मनोहर माळगावकर, जयसिंगराव पवार यांसारख्या मराठीतील प्रस्थापित लेखकांसोबतच नव्या लेखकांचे साहित्य त्यांनी प्रकाशित केले.

रॉबिन कुक, मायकेल क्रायटन, मारिओ पुझो, जॉन ग्रिशम, डॅन ब्राऊन, जेफ्री आर्चर, फ्रेडरिक फोसिंथ, ली चाईल्ड यांसारख्या जागतिक लेखकांबरोबरच सुधा मूर्ती, तस्लिमा नसरीन, ओशो, किरण बेदी, एस. एल. भैरप्पा, गुलजार, दलाई लामा, मलाला युसुफझाई यांच्यासह इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील तसेच फ्रेंच, डच यांसारख्या परदेशी भाषांमधील साहित्याचेही मराठी अनुवाद प्रकाशित केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

बिश्नोईचा मुख्य हस्तक हॅरी बॉक्सर अमेरिकेत ताब्यात; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार

Lakshmi Pujan 2026 Marathi Wishes : लक्ष्मीपूजनानिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा; पाहा सुंदर HD ग्रीटिंग कार्ड्स

Diwali 2026 : यंदा नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपूजन एकाच दिवशी; लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या